विविधतेतील एकता (Unity in Diversity) - Aniruddha Bapu Marathi Discourse 21 August 2014

Unity in Diversity

Unity in Diversity - भारतीय संस्कृती जाणून घेण्यासाठी वसुन्धरेचा इतिहास जाणून घेणे आवश्यक आहे. भारतात वेगवेगळ्या प्रदेशातील रीतिरिवाज असले, तरी त्यांचा मूळ गाभा एकच आहे (Unity in Diversity). माता-पिता-गुरु यांचा सन्मान राखणे, गंगेबद्द्ल पूज्यभाव असणे, हळद-कुंकू-अक्षता-श्रीफळ यांचा पूजा-उपचारांत वापर असणे अशा अनेक गोष्टी सर्वत्र समानपणे आढळतात. तो सच्चिदानन्द परमात्मा एकच आहे, जाणकार त्याला विविध नामांनी संबोधतात, हे सत्य भारतीय संस्कृतीने सांगितले आहे, असे परम पूज्य सद्गुरु श्रीअनिरुद्धांनी त्यांच्या २१ ऑगस्ट २०१४ रोजीच्या प्रवचनात सांगितले, जे आपण या व्हिडियोत पाहू शकता.

॥ हरि ॐ ॥ ॥ श्रीराम ॥ ॥ अंबज्ञ ॥